ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच आज 4 जुन, रविवारी निधन झाले आहे. त्यांच वय 94 वर्षे अस होतं. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच निधन झाले आहे. वयानुसार प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्याचा त्रास त्यांना होत होता. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच निधन झाल्यानंतर सिनेसृष्टीत शोकाकळा पसरली आहे.
सुलोचना लाटकर यांच्यावर गेल्या महिनाभरपासून उपचार सुरू होते. काल शनिवारपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सुलोचनदीदिंचं पार्थिव उद्या सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचं निवासस्थान ‘प्रभादेवी’ येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर उद्या सोमवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
सुलोचना दीदी ह्या मराठी आणि हिंदी अभिनेत्री होत्या. त्यांनी 1943 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 50 मराठी सिनेमांमध्ये काम केले होते, आणि हिंदी 250 सिनेमांमध्ये काम केले. त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. सासुरवास, वहिनींच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, धाकटी जाऊ या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हिंदी सिनेमांमध्ये त्यांना जास्तीत जास्त आईच्या भूमिकेमध्ये आपण पहिले. दिल देके देखो या चित्रपटातील आईची भूमिका अविस्मरणीय आहे. अब दिल्ली दूर नही, सुजाता, साजन, सुहाग रात, आये दिन बहार के, चिराग,आशा, मजबूर, आदमी, जुगणू अशा जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
सुलोचनादीदी यांच अभिनय खूपच छान होत. सुंदर अशा अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. भालजी पेंढारकर यांच्याकडून त्यांनी अभिनयाचे मार्गदर्शन घेतले. प्रेक्षकांच्या मनात आजही त्या आणि त्यांचे अभिनय जीवंत आहे.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाचं दुःख व्यक्त केलं आहे. सुलोचना दीदी लाटकर यांना भावपूर्ण श्रध्द्धांजली!