शेतकरीच नवरा हवा ही कलर्स वाहिनीवरील मालिका खुप लोकप्रिय होत चालली आहे. एका शेतकऱ्याची कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. सया आणि रेवा यांचं नुकतच लग्न झाले आहे. या लग्नाला रेवाच्या बाबांचा नकार होता. रेवा ही सयावरती खुप प्रेम करते. सयाही पाहुणीबाईशी जीवापाड प्रेम करतो. या दोघांची जोडी खूपच छान दिसते.
लग्नानंतर रेवाचा ‘वटपौर्णिमा’ हा पहिला सण आहे. पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे रेवा वडाची पूजा करायला जाते. सयाजी रेवासोबत पूजा करण्यासाठी जातो. पूजा झाल्यानंतर सयाजी रेवाला विचारतो, तुम्ही काय मागितल? तेव्हा रेवा म्हणते मला सात जन्मी हाच नवरा मिळू दे. त्यावर सया म्हणतो मला तर सात जन्मी नव्हे जन्मोजन्मी तुम्हीच बायको म्हणून हव्यात. सयाजीला रेवाचा साथ नेहमी पाहिजे. रेवाला ही सयासोबत आजन्म प्रवास करायचा आहे. दोघांनाही एकमेकांची साथ कायम हवी आहे. रेवा वटपौर्णिमा लुकमध्ये खूपच गोड दिसत आहे. नाकात नथ, जांभळ्या कलरची साडी रेवा नेसली आहे.
वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर तिथे सयाची काकीसाहेब सूर्यकांता येते. त्या सया आणि रेवाला म्हणतात तुमच लग्न हे पुढच्या ७ आठवडे पण टिकणार नाही. तुमचंच घर तुमच्या विरोधात असेल. रेवाच्या दोन्ही जावा तिच्या विरोधात असणार आहेत. या नव्या संकटाला रेवा आणि सया कसे सामोरे जातील? हे पाहणे खूपच उत्साहित आहे. सया आणि रेवाचा लग्नानंतरचा प्रवास पाहणं खूपच उत्सुक असेल. दोघे आपला संसार कसा करतील? सूर्यकांताला समोर कसे सामोरे जातील? याची प्रेक्षकांना खूपच आतुरता आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका, ‘शेतकरीच नवरा हवा’ सोम ते शनि संध्या. 6:00 वा. आपल्या लाडक्या कलर्स वाहिनीवर.