शिवांगी जोशी आणि कुशल टंडनची बरसातें मौसम प्यार का मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच येत असतात. काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून खुप वर्षांनी बंद होतात, तर प्रेक्षक मालिका पुन्हा चालू करा अशी मागणी देखील करतात. आता Sony Tv या हिंदी चॅनल वर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव ‘बरसातें मौसम प्यार का’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो हा खूपच छान आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘बरसातें मौसम प्यार का’ या मालिकेत अभिनेत्री शिवांगी जोशी आणि अभिनेता कुशल टंडन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांची नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेची निर्माती एकता कपूर आहे. एकताने यावेळेस एका नवा चेहऱ्याची निवड केली आहे. शिवांगी आणि कुशलने याआधी एकत्र काम केले नाही. या दोघांचा Onscreen Romance आणि Fresh जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

शिवांगीने याअगोदर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. नायरा या पात्राला लोकांनी खूपच पसंती दिली होती. तिने अभिनेता मोहसीन खान याच्याशी Onscreen Romance केला होता. त्या दोघांची जोडी खूपच प्रसिद्ध झाली होती. आता तिची आणि कुशलची जोडी किती Superhit होतेय हे पाहणे खूपच उत्सुक आहे.

अभिनेता कुशल टंडन याची ‘बेहद’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. आजही या मालिकेला प्रेक्षक खूपच मिस करतात. जेनिफर विंगेट आणि कुशल टंडनची जोडी खूपच लोकप्रिय होती. या दोघांची ही जोडी खूपच सुंदर होती. आता शिवांगी आणि कुशल यांची नवी जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्साहित आहेत.

‘बरसातें मौसम प्यार का’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो हा खूपच सुंदर आहे. पाऊस हा प्रेमाचा ऋतू असतो, असे या मालिकेचे शीर्षक आहे. ही मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment