दत्तू मोरेच्या रिसेप्शनची चर्चा, हास्यजत्रेचे कलाकार उपस्थित

हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे नुकताच २३ मे ला विवाह बंधनात अडकला आहे. त्याचा विवाह थाटामाटात पार पडला. त्याच्या प्रीवेड्डिंगची , लग्नाची सर्वत्र चर्चा होती. त्याचा अन त्याच्या बायकोचा लग्नाचा लुक कायम चर्चेत राहिला. त्याची बायको स्वाती घुनागे ही एक स्त्रीरोग तज्ञ असून, पुण्यात तिचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्याच्या रिसेप्शन ची चर्चा सोशल मीडियावर सध्या जोरदार सुरू आहे. मग त्याचा लुक असो किंवा त्याच्या रिसेप्शनला उपस्थित महाराष्ट्राची हास्यजत्रेचे कलाकार असोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत, रसिका वेंगुरलेकर, रोहित माने, वनिता खरात, विराज जगताप या कलाकारांनी दत्तूच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. सर्वांनी शुभेच्छा देत या जोडप्याबरोबर छान असे फोटो काढले. आपल्या सोशल मीडिया वर फोटो शेअर करत सर्वांनी खुप साऱ्या शुभेच्छा नवविवाहित जोडप्याला दिल्या.

दत्तू आणि स्वातीने जांभळ्या कलरचा ड्रेस परिधान केला होता. दोघेही त्या ड्रेस मध्ये खुप सुंदर दिसत होते. त्या दोघांनी मॅचिंग ड्रेस परिधान केले होते. सुंदर कपलसाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Comment