छोट्या पडद्यांवर अनेक नवे शो आपल्याला पाहायला मिळतात. मग ते हसणारे असो,डान्सचे असो, गाण्याचे असो तसेच बिग बॉस सारखा शो असो प्रेक्षक अशा शोला चांगलीच पसंती देतात. आता लोकप्रिय चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’ जवळपास १० वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे हा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे. हा शो झी मराठीवर सुरू होणार असून याचे निवेदन गायक, अभिनेते, संगीतकार अवधूत गुप्ते करणार आहेत. आपल्या नवीन अंदाजमध्ये अवधूत गुप्ते या शोला जज करणार आहेत. या नव्या सीजनमध्ये आपल्याला कोणत्या नवनवीन गमती ऐकायला आणि पाहायला मिळणार याची रासिकप्रेक्षकांना आतुरता आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या शो मधून पुन्हा सगळ्यांची गुपित उलगडणार आहेत.
हा चॅट शो झी मराठीवर ४ जूनपासून, दर रविवारी रात्री ९:००वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रोमो मध्ये शो मधील खुर्ची दाखवण्यात आली आहे. जी खुर्ची देशाचं भवितव्य घडवते, खुर्ची र्निर्दोशांना न्याय मिळवून देते, खुर्ची माणसांचा जीव वाचवते, खुर्ची प्रश्न विचारते? हिच्या प्रश्ननांना ही खुप धार आहे. तर शोमधील खुर्चीवर कोण कोण बसणार? तुम्हाला काय वाटतं. तर आता खुपणार नाही, टोचणार ………. या खुर्चीवर जे सेलेब्रिटी लोक, राजकारणी लोक,किंवा इतर मान्यवर बसणार आहेत त्यांना अवधूत गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाहीत तर टोचणार आहेत.
हा शो पाहण्याचं खरं कारण ती खास आणि आकर्षक खुर्ची. या खुर्चीवर कोण कोण बसणार आहे? हे पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. अवधूत गुप्ते असे प्रश्न विचारणार आहेत की सेलेब्रिटी लोकांना खरं बोलण्यास मजबूर करतील. या शोमध्ये एक नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने चॅनलच्या टीआरपीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.