मालिका असो किंवा चित्रपट प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. शूटिंग करत असताना कलाकारांच्या जीवावरही बेतलं जात. शूटिंग दरम्यान अनेकदा अपघाताच्या घटना आपण वाचल्या असतील किंवा पाहिल्या असतील. अशाच एका अपघातात एक कलाकार जखमी झालेला आहे. कोणत्या कलाकाराला दुखापत झालेली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एका अपघातात अभिनेता देवदत्त नागे याला किरकोळ अशी दुखापत झालेली आहे. देवदत्त सध्या “जीव माझा गुंतला” मालिकेत काम करताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्याला डोळ्याच्या खाली थोडीशी इजा झालेली एका फोटोमधून स्पष्ट होतेय. ही माहिती देवदत्तने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवदत्त म्हणाला, “आता काही दिवस आराम…. देवाचे आभार की डोळा वाचला “.
आदिपुरुष या आगामी चित्रपटामुळे देवदत्त काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनला होता. म्हणूनच त्याच्या आदिपुरुष चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. झी मराठीवरील “जय मल्हार” या लोकप्रिय मालिकेमुळे देवदत्तला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. सध्या तो “जीव माझा गुंतला” मालिकेत काम करत आहे. परंतू दुखापतीमुळे त्याने शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतलाय.