”माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका बंद होणार नसून ,सुरू होणार एका वेगळ्या वेळेत ..

झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने खुप कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे म्हणजेच यश आणि नेहा यांची जोडी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तसेच परीच्या भूमिकेत असलेली मायरा वायकुळ हिला देखील प्रेक्षकांची खुप पसंती मिळत आहे. मालिकेतील इतर कलाकारांमुळे तर मालिकेची अजूनच शोभा वाढतेय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही दिवसांपासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. मालिकेतील सगळ्या कलाकारांनी शुटींगचा शेवटचा दिवस म्हणून पोस्ट देखील केल्या होत्या. शुटींगच्या शेवटचा दिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर शेअर केलेले. पण आता निर्माते , दिग्दर्शक यांनी हा निर्णय बदलल्याचे दिसून येत आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या इनस्टाग्राम हॅंडल वर एक फोटो शेअर केला ज्यात ‘ही रेशीमगाठ तुटायची नाय’ असे लिहिले आहे. आणि फोटोला कॅप्शन देत ‘एवढ्या सहजासहजी कशी तुटेल तुमची आणि आमची रेशीमगाठ’आम्ही कुठेही जात नाही आहोत,असे लिहिण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार उद्यापासून मालिकेच्या शुटींगला सुरवात होणार आहे. पुन्हा एकदा यश नेहाची लवस्टोरी आणि परीची मस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र एका वेगळ्या वेळेत . सोमवार ते शनिवार सायंकाळी 6.30 वाजता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ झी मराठी वर पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment