झी मराठी वर ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नव्या मालिकेतील अप्पी कोण?

झी मराठी वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . त्यातच 22 ऑगस्ट पासून एक नवीन मालिका आपल्या भेटीला येत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ असं या मालिकेच नाव आहे. अप्पी नावाच्या मुलीची कलेक्टर होण्याची गोष्ट या मालिकेत दिसणार आहे. 22 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री 7 वाजता अप्पी म्हणजेच अपूर्वा आपल्या भेटीला येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अप्पीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव शिवानी नाईक असं आहे .शिवानी मुळची औरंगाबादची आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही शिवानीची पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.अपर्णा सुरेश माने ही ग्रामीण भागातली साध्या कुटुंबातील मुलगी अनेक संकटे पार करून तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करते अशी गोष्ट दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या वज्र प्रॉडक्शनने केली आहे. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत.
तर तुम्ही देखील या अप्पीची गोष्ट पाहण्यासाठी उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment