संतोष जुवेकर ने सांगितला शाहरुख खानच्या रेड चिली कंपनी मधला तो अपमानाचा तो किस्सा आणि त्याचा बदला!

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

संतोष जुवेकर ने मराठी चित्रपट सृष्टि मध्ये अनेक सुपर-हीट मराठी चित्रपट दिले आहेत. त्याचे झेंडा, मोरया , रेगे ही चित्रपट खूप गाजले आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिल.

नुकताच Neflix रीलीज झालेला शाहरुख खान च्या मालिकेच्या रेड चिली या प्रॉडक्शन हाऊस चा डार्लिंगस हा चित्रपट रीलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षक पसंद करत आहेत. या चित्रपटामध्ये संतोष एक महत्वाची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटानिमित्त की काय संतोष ने एक किस्सा सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेयर केला.

त्याने Instagram वर एक पोस्ट शेयर केली आहे त्यात त्याने आस लिहिल आहे की,

त्याने या पोस्ट च्या माध्यमातून त्याच्या सोबत स्ट्रगल च्या काळातील एक किस्सा सांगितला आहे.

वर्ष -१९९८.
ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला production office)

मी office च्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का कुणाला भेटता येईल का म्हणुन gate वर जाऊन विचारतो एका security gard ला तर तो मला ओरडून ” चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो…….. आणि मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो ” रुक तू…….
एकदिन तुमलोगही gate खोलेगा मेरेलिये ” असं बोलून त्या bulding जवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो.
पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला.

मग काही वर्षांनतर मला एक call येतो ” hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film,
if possible plz come to the office.”
❤❤❤

वर्ष -२०२०
ठिकाण – खार – सांताक्रूझ.
Redchillis entertainment pvt ltd (शाहरुख खान production office)

मी gate वर पोहोचतो माझ्या गाडीतून, गाडी gate च्या बाहेर parking साठी जागा शोधतोय तेव्हढ्यात call येतो ” hi sir where r u? We r waiting for u.” मी त्यांना सांगतो की मी आलोय खाली आहे parking साठी जागा शोधतोय तर तो मला म्हणतो अरे sir plz park inside wait m sending someone to assist u.
आणि काही मिनटात office च gate उघडल जात security धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो “sir plz आईये.” बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स……. 😊
ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप मरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो ” भाई य्ये मेरा शेर….. ज्जा जिले अपनी जिंदगी.”
शारुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य.
“कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.”
आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी 🙏🙏🙏
बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा 🙏🙏
बाकी मला अजून मोठ्ठ करायला तुम्ही सगळे आहातच आवडलं तर शाब्बास म्हाना आणि नाही आवडलं तर कान पिळा पन हानू नका 😄😄😄🤗❤❤🙏🙏🙏

हा किस्सा ऐकून प्रेक्षक सुद्धा संतोष च कौतुक करत आहेत.

Leave a Comment