अभिनेत्री प्रिया बापट आणि बहीण श्वेता बापट मिळून करतायत व्यवसाय..

अभिनय क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात उतरून अनेक कलाकार मंडळींनी आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक नाईका त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करून त्या उद्योजिका झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने देखील स्वतःची उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रियाने आजपर्यंत अनेक गाजलेल्या मराठी सिनेमा आणि सिरीज मध्ये काम केली आहेत. आणि यामुळे प्रिया बापट सतत प्रेक्षकांच्या चर्चेत राहिली आणि प्रेक्षकांची आवडती देखील बनली.

प्रिया बापटची सख्या बहिणीच नाव श्वेता बापट असे असुन ,या दोघी बहिणी मिळून एक व्यवसाय करत आहेत. श्वेता ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि कॉश्चूम डिझायनर म्हणून ओळखली जाते. प्रिया आणि उमेश सह ती इतर अनेक गाजलेल्या कलाकारांची स्टायलिस्ट आहे. जाहिराती असतील किंवा अनेक गाजलेल्या मालिकांच्या टायटल सॉन्गसाठी श्वेताने स्टायलिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

प्रिया आणि श्वेता दोघी बहिणींनी मिळून ‘सावेंची’ या नावाने साड्यांचा ब्रॅंड सुरू केला आहे .या ब्रॅंडची वेबसाइट आणि इनस्टाग्राम माहिती असल्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन खरेदी देखील करता येणार आहे.

प्रिया बापट आणि श्वेता बापट दोघींनाही नविन व्यवसायासाठी  ATOZMARATHI कडून खुप खुप शुभेच्छा.  

Leave a Comment