ही मालिका आहे TRP च्या यादीत अव्वल स्थानावर…

स्टार प्रवाह वरील सगळ्याच मालिका trp मध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करत असतात. TRP मध्ये अव्वल येण्यासाठी मालिकांमध्ये नविन नविन ट्विस्ट आणले जातात.सगळ्याच मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात पण मालिकांमध्ये येणाऱ्या ट्विस्ट वर प्रेक्षक मालिकांना पसंती देत असतात. आज आपण पाहणार आहोत प्रेक्षकांच मनोरंजन करून कोणती मालिका TRPच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका TRPच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. तर नवव्या स्थानावर आहे ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ ही मालिका. झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका देखील प्रेक्षकांना खुप आवडते. यातील परिच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत. ही मालिका आठव्या स्थानावर आहे. तर सातव्या नंबर वर आहे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. कमी दिवसातच अप्पू आणि शशांकच्या जोडीला प्रेक्षकांडून खुप प्रेम मिळालय. तुम्हाला कळालच असेल ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका TRP च्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेच्या शीर्षक गीत ते मालिकेच्या प्रत्तेक भागावर प्रेक्षक प्रेम करतायत. ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर आहे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका. अनिरुद्ध आणि अरूंधतीची ‘आई कुठे काय करते ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. तर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा.

तर यातील तुमची आवडती मालिका कोणती हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment