‘अग्गबाई सासुबाई’ नंतर डॉ. गिरीश ओक पुन्हा एका नव्या भुमिकेत

‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतून शुभ्राचे सासरे आणि आसावरीचे पती म्हणून आपल्या भेटीला आलेले प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक . मालिकेतील त्यांची अभिजीत राजेंची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली. डॉ. गिरीश ओक आता एका नाटकाद्वारे पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. ३८ कृष्ण व्हिला असं या नाटकाच नाव आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक , डॉ श्वेता पेंडसे अभिनीत ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्च रोजी दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे दुपारी ४.१५ वाजता होणार आहे. तसेच रविवार २० मार्चला दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतन येथे प्रयोग असणार आहे. या नाटकाची निर्मिती मिहिर गवळी यांनी केली असुन सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत.

तर तुम्ही डॉ. गिरीश ओक यांच्या नविन नाटकासाठी उत्सुक आहात का? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment