रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत नविन शेवंताची एन्ट्री

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सगळ्याच पात्रांमुळे मालिकेचे ३ ही भाग गाजतायत. मात्र यातील सगळ्यात आकर्षित पात्र म्हणजे शेवंता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडल्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर प्रेक्षकांच लक्ष लागल ते नविन शेवंता कोण असणार याकडे. तर शेवंता या पात्रासाठी एक नविन चेहरा सगळ्यांसामोर आलाय तो म्हणजे अभिनेत्री कृतिका तुळसकरचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कृतिका गेले १८ वर्ष थियेटर मध्ये कार्यरत आहे. तसेच तिने अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केली आहेत. कृतिका एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. प्रोफेशनली कृतिका ही सायकॉलॉजीस्ट असुन तिने तिची आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्रात पदार्पण केल. आता या नविन शेवंताला प्रेक्षक नक्कीच स्विकारतील अशी तीला आशा आहे.

तर तुम्हांला नविन शेवंता कशी वाटली हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.   

Leave a Comment