कलर्स मराठी वाहिनी वरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत सध्या एक भयानक ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतच होतो अपर्णा संपूर्ण ढालेपाटील कुटुंबाला खुप त्रास देत होती. म्हणून तिचा राग सगळ्यांच होता . आणि म्हणूनच आईसाहेब, सुजीत आणि दादासाहेब हे तिघेही आपापल्या परीने तिचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा खून झाल्यामुळे या तिघांवरही तिच्या खुनाचा संशय होता. परंतु अपर्णाचा खूनी या तिघांपैकी एकही नसून पंजाबराव म्हणजेच संजुचे डॅडी आहेत.
नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतय की गुलाब पंजाबरावांना अटक करून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन येते. आणि हे सगळ पाहून संजुला आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो.
अपर्णाच्या खुनाच्या आरोपाखाली पंजाबरावांना अटक झाल्यामुळे संजीवनी आता काय करेल, या सगळ्याला ती कशी सामोरी जाईल हे पाहण उत्सुकतेच असणार आहे. तर पाहत रहा राजा राणीची गं जोडी रात्री ७ वाजता फक्त कलर्स मराठी वाहिनीवर