बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अक्षय वाघमारेने आपल्या लेकीसोबतचे खास फोटो केले शेअर

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरातून बाहेर पडलेला पहिला स्पर्धक म्हणजे अक्षय वाघमारे. अक्षय जरी घरातून बाहेर पडला असेल तरी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना अक्षयची फार आठवण येतेय. ३ आठवड्यातील त्याच्या खेळाने, स्वभावाने सगळ्यांचीच मनं त्याने जिंकून घेतली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

घरा बाहेर येताच त्याने त्याच्या लेकी सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुठ आवळून जेव्हा तु बोट धरतेस, तो प्रत्तेक क्षण माझा खास होतो. तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत , मला जग जिंकल्याचा भास होतो. असं गोड कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.या फोटोवर त्याच्या चाहत्यांसोबतच कलाकार मित्र मैत्रिणींनी देखील कॉमेंट्स करत फोटो किती गोड असल्याच सांगितल आहे. अक्षयला बिग बॉसच्या घरात देखील त्याच्या मुलीची खुप आठवण यायची, तो फॅमिली फोटो पाहत मी तुम्हांला खुप मिस करतोय अस सांगताना आपण पाहिलच.

तर अक्षयचा हा त्याच्या लेकीसोबतचा फोटो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment