अभिनेता आदिश वैद्य याचा जन्म ५ ऑक्टोंबर १९९२ ला मुंबई येथे झाला. त्याच शालेय शिक्षण हे V. N. S गुरु स्कूल मुंबई येथे पुर्ण केल तसेच R. A पोतदार कॉलेज मधुन त्याने बॅचलर ऑफ कॉमर्सच शिक्षण घेतलय.
आदिशच्या आईचे नाव मीनल वैद्य आहे तर वडिलांचे नाव अरविंद वैद्य असे आहे. आदिशला एक भाऊ आहे ज्याच नाव रोहित वैद्य असे आहे. त्यासोबतच आदिश आणि रेवतीची जोडी सळ्यांनाच महित आहे. रेवती लेले ही आदिशची गर्लफ्रेंड आहे. ती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तीला आपण स्वामिनी या मालिकेत पहिले होते. मराठी मालिकेंसोबतच ती हिंदी मालिकेंमधून देखील झळकली आहे. आणि आता तीला आपण कलर्स मराठी वरील सोन्याची पावलं या मालिकेत नेत्राची भूमिका साकारताना पाहत आहोत .
आदिशने स्टार प्रवाह वरील जयोस्तुते या मालिकेद्वारे टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केल. त्यांनंतर तुमचं आमच सेम असतं , रात्रीस खेळ चाले, गणपती बाप्पा मोरया, जिंदगी नॉट आउट , कुंकू टिकली आणि ट्याटू, या मराठी मालिकांमध्ये तर साम दम दंड भेद , नगिन ३ , बैरिस्टर बाबू या हिंदी मालिकेंमध्ये त्याने काम केले आहे आणि आता गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत त्याला आपण पहिले आहे.
तर आदिशचा बिग बॉसच्या घरातील खेळ तुम्हांला कसा वाटतोय हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा