बिग बॉसच्या घरात अभिनेता आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एंन्ट्री

बिग बॉस मराठी सीजन ३ सुरू झाल्यापासून त्या घरातील भांडण, खेळ, मजा मस्ती, कुरघोडया हे सगळ आपण पाहत आलोय. पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन नसल्यामुळे सगळेच सदस्य घरात सेफ राहिले. आणि दुसऱ्या आठवड्यात कीर्तनकार शिवलीला यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यास सांगण्यात आले म्हणून वोटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या. आणि त्यानंतर मागच्या आठवड्यात शिवलीला यांनी त्यांच्या तब्बेतीमुळे बिग बॉसच्या घरात मी पुन्हा येउच शकणार नाही असा निर्णय सांगितला. त्यामुळे आता कोणाचीतरी वाइल्ड कार्ड एंन्ट्री होणार हे मात्र नक्की पण ते नक्की कोण असणार तो की ती असा प्रश्न सगळ्यांनाच आहे. त्यासोबतच या आठवड्यात एक स्पर्धक घरा बाहेर देखील जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर वाइल्ड कार्ड म्हणून येणाऱ्या स्पर्धकाच नाव आहे अभिनेता आदिश वैद्य. आदिशने स्टार प्रवाह वरील जयोस्तुते या मालिकेद्वारे टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केल. त्यांनंतर तुमचं आमच सेम असतं , रात्रीस खेळ चाले, गणपती बाप्पा मोरया, जिंदगी नॉट आउट , कुंकू टिकली आणि ट्याटू, या मराठी मालिकांमध्ये तर साम दम दंड भेद , नगिन ३ , बैरिस्टर बाबू या हिंदी मालिकेंमध्ये त्याने काम केले आहे आणि आता गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत त्याला आपण पाहत आहोत.

तर आदिश बिग बॉस मराठीच्या घरात आला आहे. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हांला आदिशला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment