अभिनेता विकास पाटील याचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ रोजी कोल्हापूर येथे झाला. पण तो लहानाचा मोठा पुण्यात झाला. पुण्यातील M.S.S High School मध्ये त्याच शालेय शिक्षण पुर्ण झाले तर fergusson कॉलेज मध्ये त्याने B. SC इन बॉटणी मध्ये ग्रॅजुएशन पुर्ण केलय.
विकासच्या वडिलांच नाव बाळकृष्ण पाटील तर आईचे नाव रेखा पाटील असे आहे . विकासचे ६ डिसेंबर २०१० ला स्वाती पाटील हिच्यासोबत लग्न झाले असुन त्यांना मौर्य पाटील नावाचा मुलगा देखील आहे.
विकासने नाटकांमध्ये काम करून त्याच्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केली. त्याच्या चार दिवस सासूचे, असंभव, लेक माझी लाडकी, अंतरपाट, माझिया माहेरा, मिसेस तेंडुलकर, सुवासिनी, स्वप्नांच्या पालिकडले, अशा अनेक गाजलेल्या मालिका आहेत. तसेच झी मराठी वरील नावाजलेल्या मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको आणि तुझ्यात जीव रंगला यामध्ये देखील त्याने काही छोट्या भूमिका साकारल्या होत्या. आणि आत्ताच त्याच्या कलर्स मराठी वरील बायको अश्शी हवी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात आपण विकासला विभासच्या भुमिकेत पहिले होते. मालिकेंसोबतच त्याने शेंटिमेंटल , तुझ्याविन मरजावा , आजचा दिवस माझा, तुकाराम यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केली आहेत. आणि आता त्याला आपण बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये पाहतच आहोत .
तर तुम्हाला विकास पाटीलचा बिग बॉस च्या घरातील खेळ आवडतोय का? हे कॉमेंट्स करून नक्की सांगा.