अभिनेता विशाल निकमने माय भवानी या गाण्यावर डान्स करत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. अभिनेता विशाल निकम हा अभिनयासोबतच फिटनेस साठी ओळखला जातो. स्टार प्रवाह वरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तसेच ‘मिथुन’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल. त्यानंतर ‘साता जन्माच्या गाठी’ आणि त्याच वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारली होती. आणि काही दिवसांपूर्वी ‘जय भवानी ,जय शिवाजी’ या मालिकेत शिवा काशिद या भुमिकेत झळकला होता.
तर विशाल आता बिग बॉसच्या घरात काय आणि कशी खेळी खेळणार हे पाहण उत्सुकतेच असणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील बिग बॉस सीजन ३ पाहायला अजिबात विसरू नका.