बिग बॉस मराठी सीजन ३ चा ग्रँड प्रीमियर अगदी उत्साहात सुरू झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या खास डान्स परफॉर्मस ने कार्यक्रमाची सुरवात झाली . तसेच या शो चे होस्ट महेश माजरेकर यांनी शोच्या टाइटल वर केलेल्या डान्सची झलक देखील पाहायला मिळाली. या शोमध्ये पहिली स्पर्धक आली ती अभिनेत्री सोनाली पाटील.सोनालीने छबी दार छबी या गाण्यावर डान्स केला.
अभिनेत्री सोनाली पाटील हिने सोनी मराठीवरील ‘जुळता जुळता जुळतय’ की या मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण केल. त्यानंतर स्टार प्रवाह वरील ‘वैजू नंबर १’ या मालिकेत ती वैजूच्या मुख्य भुमिकेत दिसून आली. आणि त्यानंतर ‘देवमाणूस या मालिकेत आर्या वकिलाची भूमिका देखील तिने उत्तम निभावली. सोनाली पाटील ही व्यवसायाने शिक्षिका आहे. परंतु अभिनयाची आवड असल्यामुळे सोनाली अभिनय क्षेत्राकडे वळली.
आता सोनाली बिग बॉसच्या घरात नक्की काय धमाका करणार हे पाहण उत्सुकतेच ठरणार आहे. त्यामुळे तुम्हीही बिग बॉस मराठी सीजन ३ पाहायला अजिबात विसरू नका.