कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ ही नुकतीच सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सेटवरचे आणि मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो पोस्ट करत या मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री गौरी देशपांडे भाऊक झाली. तिने तिचा सहकलाकार विभास म्हणजेच अभिनेता विकास पाटील सोबतचे फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये त्याचे आभार मानले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

फार कमी कालावधीत जान्हवी आणि विभासच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. स्वाभिमानी आणि खंबीर जान्हवी सगळ्यांना आवडत होती . या मालिकेला हव तितक रेटिंग न मिळाल्यामुळे ही मालिका आता बंद होणार आहे.

तर ‘बायको अशी हव्वी’ ही मालिका तुम्हाला आवडायची का ? हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment