‘रात्रीस खेळ चाले ३’चे शुटींग लवकरच होणार सुरू

मार्च २०२१ मध्ये सुरू झालेली झी मराठी वाहिनी वरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ चं लॉकडाऊन मुळे अचानक शुटींग थांबवाव लागल . जवळजवळ सगळ्याच मालिकांच शुटींग पुन्हा सुरू झाले पण ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचे शुटींग अद्याप सुरू झालेले नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सूत्रांच्या माहितीनुसार ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका अद्याप सुरू का झाली नाही याचे कारण समोर आले आहे . या मालिकेच्या निर्मात्यांनी असे सांगितले आहे की ,या मालिकेचे सगळे भाग कोकण , महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शूट झालेले आहेत. आणि या जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे अद्याप आम्हांला शुटींगसाठी परवानगी मिळालेली नाही. आणि या मालिकेचे जवळजवळ सगळेच भाग नाईक वाड्यात शूट झाले होते. त्यामुळे आता आम्हांलाही शुटींग लोकेशन बदलणे शक्य होत नाही . पण ‘रात्रीस खेळ चाले ३’ चे शुटींग लवकरच सुरू होईल.

‘रात्रीस खेळ चाले ३’ झी मराठी वाहिनीवर आल्याबरोबरच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आणि आता प्रेक्षक उत्सुकतेने या मालिकेच्या नविन एपिसोडची वाट पाहत आहेत.

Leave a Comment