‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील माऊला वाढदिवसाला मिळाले हे बेस्ट सरप्राईज

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहून त्यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. या मालिकेत माऊची भूमिका अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर ही साकारत आहे. २१ जुलै रोजी दिव्याचा वाढदिवस होता . यावर्षीचा तिचा वाढदिवस तिच्यासाठी स्पेशल झाला असं दिव्या म्हणाली. सेटवरील सगळ्या कलाकारांनी मिळून दिव्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. दिव्याच्या बॉयफ्रेंडने अचानक सेटवर येऊन दिव्याला सरप्राईज दिले. आपल्या बॉयफ्रेंडला पाहून दिव्या खुप खुश झाली आणि याच आनंदात तिने त्याला घट्ट मिठी मारतानाचा व्हिडिओ स्वतः दिव्याने शेअर केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिव्याच्या बॉयफ्रेंडचे नाव अक्षय घरत असे आहे. अक्षय हा एक फिटनेस मॉडेल आहे. तसेच प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या दिव्याच्या वाढदिवसाला येऊन अक्षयने तीला चांगलेच सरप्राईज दिले.दिव्याने सेटवर दिलेल्या अक्षयच्या या सरप्राईजला आजवर दिलेले सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे असं म्हणत अक्षयचे आभार मानले आहेत.

तर तुम्हांला दिव्या आणि अक्षयची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment