‘सांग तु आहेस का ?’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा संपन्न

स्टार प्रवाह वरील ‘सांग तु आहेस का ?’ या मालिकेतील दीप्ती म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव प्रतीक असे आहे. तिच्या काही कलाकार मित्र मैत्रिणींनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. त्याचसोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने देखील भाग्यश्रीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. भाग्यश्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याची शॉर्ट व्हीडिओ शेअर करत सिद्धार्थ आणि अभिनेत्री पुजा कातूर्डेचे आभार मानले आहेत. या व्हिडिओखाली भाग्यश्रीच्या अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी कॉमेंट्स करून तिचे अभिनंदन केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर तुम्हांला अभिनेत्री भाग्यश्री दळवी आणि प्रतीक यांची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .

Leave a Comment