अभिनेत्री सुरेखा सीकरी म्हणजेच कलर्स टीव्ही वरील हिंदी मालिका बलिकावधू यामधील दादीसा यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले आहे . याची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या . २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायुचा झटका आला होता . तसेच २०२० मध्ये त्यांना ब्रेनस्टॉकचा त्रास देखील त्यांना झाला होता. आणि त्यात आज सकाळी त्यांची ह्रदयक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले.
सुरेख यांनी १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना तमस (१९८८), मम्मो (१९९५) आणि बधाई हो (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.