‘देवमाणूस’ मालिकेत होणार या अभिनेत्रीची एन्ट्री

   झी मराठी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेत काही भागांनंतर नवनविन अभिनेत्रींची एंट्री होताना आपण पाहतोय. अश्यातच आता पुन्हा एकदा एक नविन अभिनेत्री या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे . अभिनेत्री माधुरी पवार असं तिचं नाव. माधुरी ही झी युवा वरील अप्सरा आली या शो ची विजेती आहे. त्याचबरोबर झी मराठी वरील सगळ्यांची आवडती मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यात शेवटच्या काही भागांमध्ये माधुरीने नंदिता वाहिणीसाहेबांची भूमिका साकारली होती. आणि या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला . तिच्या चाहता वर्गात देखील भर पडली . माधुरी सोशल मीडिया वर नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देवमाणूस या मालिकेत तिच्या एंट्रीने तिच्या चाहत्यांना चांगलीच आनंदाची बातमी मिळाली आहे. या मालिकेत ती आपल्याला कोणत्या भुमिकेत दिसणार , तिची भूमिका कशी असणार हे येणाऱ्या भागात कळेलचं.

 तर तुम्ही अभिनेत्री माधुरी पवारला ‘देवमाणूस’ या मालिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा .

Leave a Comment