अचानक का बंद करण्यात आल्या या मराठी मालिका ?

लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांचे खुप मोट्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्राला देखील मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा फटका आणि trp कमी या कारणांमुळे काही मालिका बंद करण्यात आल्या आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर जाणून घेऊयात नेमकी कोण कोणत्या मालिकांचा यामध्ये समावेश आहे .

१] सख्खे शेजारी

कलर्स मराठी वरील सख्खे शेजारी हा कार्यक्रम जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या कार्यकर्माचे चित्रीकरण आउटडोर करावे लागणार होते. पण महाराष्ट्र सरकारने आउटडोर शुटींगला परवानगी न दिल्यामुळे हा शो बंद करावा लागला. अभिनेता चिन्मय उद्गिरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता .

२] चांदणे शिंपीत जाशी

ही मालिका ९७ एपिसोड नंतर बंद करण्यात आली याच कारण म्हणजे या मालिकेला प्रेक्षकांची जराही पसंती मिळत नव्हती. या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे तर अभिनेता सचित पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

३]   श्रीमंताघरची सुन

सोनी मराठी वरील श्रीमंताघरची सुन ही मालिका अथर्व आणि अनन्या या भूमिकेंच्या प्रेम कथेवर आधारित होती . या मालिकेला प्रेक्षकांची पसंती न मिळाल्यामुळे मालिकेचा trp खुपच कमी होता. यामुळे  ही मालिका बंद करण्यात आली आहे.

४] काय घडल त्या रात्री ?

झी मराठी वरील ‘काय घडल त्या रात्री ?’ यामध्ये बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. अभिनेत्री मानसी साळवीने प्रमुख भूमिका साकारली होती. लॉकडाऊनच्या काळात या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले त्याचबरोबर या मालिकेला trp खुपच कमी मिळत होता . आणि या मालिकेच्या बऱ्याच भागांचे चित्रीकरण हे आउटडोर होते आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही . त्यामुळे ही मालिका बंद करण्यात आली.

५] सावित्रीजोती

सोनी मराठी वरील सवित्रीजोती या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत नव्हती त्यामुळे trp देखील कमी मिळत होता . आणि म्हणून नविलाजाने निर्मात्यानी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला .

 ६] दख्खनचा राजा ज्योतिबा

 स्टार प्रवाह वरील दख्खनचा राजा ज्योतिबा यामालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत होती. परंतु लॉकडाऊन मुळे ही मालिका बंद करावी लागली .महाराष्ट्रात शुटींगसाठी बंदी होती आणि या मालिकेचा सेट राज्याबाहेर हलवण शक्य नव्हत त्यामुळे ही मालिका निर्मात्यांना बंद करावी लागली. 

Leave a Comment