या कारणामुळे सोडली अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने ‘मुलगी झाली हो’ ही मालिका

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांच्या खुपच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील माऊ ,शौनक ,सिद्धांत यांची भूमिका तर प्रेक्षकांना आवडतेच पण नकारात्मक भूमिका साकारणारी दिव्या देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिव्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने असं म्हंटल आहे की , नमस्कार आता पर्यंत आपण माझ्या मुलगी झाली हो या मालिकेतील दिव्या या भूमिकेसाठी भरभरून प्रतिसाद दिलात , प्रचंड प्रेम दिले यासाठी मी आपली मनापासून आभारी आहे . तुमच्या शुभेच्छा या नेहमी माझ्या पाठीशी असतातच . या पुढील आयुष्यातही माझ्यावरचे हे तुमचे प्रेम तुमचा प्रतिसाद असाच निरंतर कायम राहो . भेटूया लवकरच धन्यवाद .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तिच्या या पोस्ट वरुन ती मालिका सोडत असल्याच थोडक्यात कळत आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण प्रतीक्षा आता आपल्याला कलर्स वाहिनी वर आज पासुन सुरु होणारी ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत दिसणार आहे. प्रतीक्षा या मालिकेत चित्रा खानविलकरच्या भुमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना प्रतीक्षा म्हणाली  की मला माझ्या घरी परतल्यासारख वाटत आहे. तब्बल ३ वर्षानंतर मी पुन्हा कलर्स वाहिनीवर काम करत आहे. याआधी प्रतिक्षाला आपण घाडगे अँड सुन या मालिकेत कियाराच्या भूमिकेत पहिले होते .

तर प्रतीक्षा मुणगेकरला मुलगी झाली हो या मालिकेत मिस करणार का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  

Leave a Comment