आई कुठे काय करते या मालिकेतील अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे करोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले तरीही अश्विनी खचली नाही . तिने आपल दुख: बाजुला सारत शेतकामाला सुरवात केली. तिने शेतात काम करतानाच तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ,शेतकऱ्याची लेक .. जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही .
काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईमूग काढणी . नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे . नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्तेक गोष्ट करून देते. आयुष्यात येईल त्या परिस्तितीचा सामना करता आला पाहिजे , हीच नानांची प्रेरणा व शिकवण अस लिहिल आहे.