अभिनेता विकास पाटील बद्दल बरंच काही

कलर्स मराठी वर नुकतीच सुरू झालेली नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गौरी आणि विभास ची ही गोष्ट प्रेक्षकांना आवडू लागली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर आज आपण जाणून घेणार आहोत या मालिकेतील विभास म्हणजेच अभिनेता विकास पाटील बद्दल.

अभिनेता विकास पाटील याचा जन्म २४ सप्टेंबर १९८२ ला कोल्हापूर येथे झाला. त्याच निक नेम विकी असं आहे . त्याने त्याचं शालेय शिक्षण M.S.S हाय स्कूल पुणे येथे पुर्ण केल आहे. तर fergusson कॉलेज मधुन त्याने Bsc इन botony हे शिक्षण घेतले आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती अभिनेता विकास पाटील याच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण पाटील असुन आईचे नाव रेखा पाटील असे आहे . विकास पाटील याच लग्न ६ डिसेंबर २०१० रोजी स्वाती पाटील हिच्याशी झालं आहे. त्यांना मौर्य पाटील नावाचा एक लहान मुलगा देखील आहे. त्याने नाटकांपासून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांने चार दिवस सासूचे, कुलवधू ,लेक माझी लाडकी , असंभव , अंतरपाट, माझीया माहेरा , सुवासिनी , मिसेस तेंडुलकर यांसारख्या   अनेक मराठी मालिकांमद्धे मुख्य भूमिका साकारल्या तर माझ्या नवऱ्याची बायको , तुझ्यात जीव रंगला या मालिकेमद्धे काही छोट्या भूमिकेंमद्धे दिसून आला. तर त्याने तुकाराम , आजचा दिवस माझा , अतरंगी , तुझ्या विन मरजावा , शेंटीमेंटल यांसारख्या चित्रपटांमद्धे काम केली आहे.

आणि आता अभिनेता विकास पाटील याला आपण कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत विभास हे पात्र साकारताना पाहतच आहोत .

तर तुम्हांला विभासची भूमिका कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.  

Leave a Comment