जीव माझा गुंतला मालिकेत हा अभिनेता झळकणार

कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ती म्हणजे ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत आपल्याला मुख्य भुमिकेत पाहायला मिळालेल्या अभिनेत्रीच नाव आहे योगिता चव्हाण तर या मालिकेत आपल्याला मुख्य भुमिकेत पाहायला मिळालेल्या अभिनेत्याच नाव आहे अभिनेता सौरभ चौगुले. सौरभ चौगुले हा इंजिनियर असुन स्वतःमधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपला कल अभिनयाकडे वळवला . त्याने अभिनयाची सुरवात एकांकिकापासून केली. एकांकिका प्रायोगिक नाटक , राज्य नाट्य संस्था या सगळया माध्यमातून तो रंगभूमिशी एकरूप होत होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनयासोबतच त्याने फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचंदेखील धडे घेतले आहेत. आणि याचाच फायदा घेऊन त्याने अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीज यांच छायाचित्रण केले आहे. हे करताना तो अनेक मालिका आणि चित्रपटातून छोटी पात्र तो साकारत होता. अशातच त्याला दक्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत नकारात्मक पात्र साकारायला मिळालं. आणि आता तो या नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे . या मालिकेत तो ‘मल्हार’ ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत तो अभिनेत्री योगिता चव्हाण सोबत दिसणार असुन मालिकेचा विषय हा स्त्री प्रधान आहे.

 तर तुम्ही येणाऱ्या नव्या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आणि अभिनेता सौरभ चौगुले ला या मालिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.    

Leave a Comment