जीव झाला येडापीसा या मालिकेतील हा कलाकार काळाच्या पडद्याआड

 कलर्स मराठी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. यातील शिवा सिद्धीची जोडी तर प्रेक्षकांना आवडत होतीच पण प्रेक्षक बाकी कलाकारांवर देखील तितकच प्रेम करत होते. या मालिकेतील एका कलाकाराचं निधन झाले आहे. मालिकेतील आत्याबाईंचा PA भावे ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे एक दिवसापूर्वी निधन झाले आहे. हेमंत जोशी यांच्या सहकलाकार विद्या सावळे यांनी त्यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत म्हंटल आहे कि, सदाबहार व्यक्तिमत्त्व आज आमच्यातून हरवल , माझे मित्र माझं हक्काचं माणूस काळाने माझ्यापासून हिरावून घेतलं. हेमंत जोशी म्हणजेच मालिकेतील भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 A to Z मराठी कडून अभिनेते हेमंत जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

Leave a Comment