आई कुठे काय करते मालिकेतील आपांच्या वडिलांचे निधन

स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका लोकप्रिय आहे. त्यातील एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’ , या मालिकेतील सर्वच पात्र नेहमीच चर्चेत असतात. मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांने ‘अप्पा’ म्हणजेच मालिकेतील त्यांच्या वाडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट मध्ये त्यांनी खऱ्या आयुष्यात अप्पा म्हणजेच अभिनेते किशोर महाबोले यांनी वडिलांच्या निधनाची बातमी ऐकली तरीही शुटींग पुर्ण केले हे सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इनस्टाग्राम अकाऊंट वर किशोर महाबोले यांच्यासोबत एक फोटो शेअर करत त्यांनी, “माझी आणि आप्पांची भूमिका करणारे किशोर महाबोले यांची ओळख आई कुठे काय करते या सेट वरच झाली . पहिल्या दिवसापासून त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतल होत. अतिशय शांत आणि हसमुख स्वभाव . पण एकदा जर त्यांची सटकली तर ते कोणाच्या बापाला ते ऐकत नाहीत. या दीड वर्षात एकदा दोनदाच सटकली होती आणि क्षणात शांत देखील झाले.’ पुढे ते म्हणाले या करोनाच्या कठीण काळातही आम्ही एकत्रच सिरियलच शुटींग करत आहोत. लॉकडाउनमध्येही शुटींग चालूच होतं खुप धैर्याने आणि शांतपणे आम्हांला सगळ्यांना आधार देत काम चालू ठेवल. दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या वडिलांच निधन झालं जेव्हा ही बातमी त्यांना कळाली तेव्हा आमचा एक मिस्कील असा सिन सुरू होता. बातमी ऐकून ते हादरुन गेले. आमचे डायरेक्टर रवी करमकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितले . अप्पा म्हणाले सीन पुर्ण करतो. मग निघतो . तो प्रसंग माझ्या डोळ्यासामोरून कधीही जाणार नाही. आपल्या वडिलांची अशी बातमी कळाल्यानंतर कलाकार ते सगळं दु:ख आतमध्ये ठेवून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून एक मिश्कील सिन करतो. मनामद्धे वादळ असताना अभिनय करायचा की आपण शांत आहोत , आनंदी आहोत . तो सीन केला त्यांनी आणि मग निघून गेले. असे मिलिंद गवळी यांनी सांगितले आहे.

 तर तुम्हांला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.    

Leave a Comment