झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका “रात्रीस खेळ चाले ३” या मालिकेतून मराठी टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केलेली दक्षिण अभिनेत्री भाग्या नायर . तिने अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खुप प्रेम मिळवले आहे. तीने एक मुलाखतीत तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल काही लोकांकडून जातिभेद आणि विनोदांचा सामना करत आणि या सगळ्या प्रवासात कुटुंबीयांनी तिचे समर्थन कसे केले याबद्दल सांगितले .
मराठी टीव्ही इंडस्ट्री मद्धे प्रवेश करण्याविषयी बोलताना ती म्हणाली, “मी मुळची केरळची जरी असले तरी मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. मला मराठी भाषेची आवड आहे आणि इथल्या सगळ्यांचा आदर आहे. मला कायम चांगल्या भूमिका करायच्या आहेत, आणि मी ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये कावेरी साकारून खुप आनंद वाटत आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये काम करण्याबद्दल बोलताना भाग्या म्हणाली कावेरी आणि शेवंता साकारण्याआधी मी मागचे २ भाग पाहिले आणि खुप अभ्यास केला. मला असे वाटते कथा आणि मूलभूत गोष्टींबद्दल महित असणे आवश्यक आहे; अन्यथा आपण व्यवस्तीत काम करू शकत नाही.”
तिच्या त्वचेच्या रंगामुळे भाग्याला खुप त्रास सहन करावा लागला. ती म्हणाली, “लोक माझ्या त्वचेच्या रंगाबद्दल माझी चेष्टा करतात. सगळ्यांनी माझ्या रंगाची चेष्टा केली. मी रात्र रात्र खुप रडलेय , परंतु त्या परिस्थितीचा मी सामना केला , आणि कठोर परिश्रम करायला सुरवात केली.”
भाग्याला या सगळ्या परिस्थितीत तिच्या आई वडिलांचा खुप पाठिंबा मिळाला. ती म्हणाली, “ माझ्या आई वडिलांची इच्छा होती की मी स्वतःच्या पायावर उभी राहावी. जेव्हा मी घरी सांगितल की मला नोकरी सोडायची आहे आणि अभिनय करायचं आहे तेव्हा आईला खुप आनंद झाला होता. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आई वाडिलांमुळे.”
तर तुम्हांला भाग्या नायर ची भूमिका आवडते का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.