अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे करोनामुळे दुखद निधन

बापमाणुस या मालिकेतील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांच काल दुपारी निधन झाले. या मालिकेत त्या अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या आईच्या भुमिकेत झळकल्या होत्या. त्यांनी प्रवास , कोणी बायको देता का बायको या चित्रपटांमद्धे काम केले होते.  त्याचप्रमाणे सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या हिंदी चित्रपटात देखील त्या एका छोट्याश्या भुमिकेत दिसल्या होत्या . काल दुपारी त्यांचे करोनाने निधन झाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 अभिनेत्री अभिलाषा पाटील या शूटसाठी काही दिवसांपूर्वी बनारसला गेल्या होत्या. पण तिथे त्यांना थोडा ताप येत असल्याने त्या मुंबई मद्धे आल्या आणि त्यांनी करोनाची चाचणी केली. त्यांना करोनाची लागण झाली हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेतल गेल्या चार दिवसांपासून त्या icu मद्धे होत्या . पण काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 A to Z मराठी कडून अभिनेत्री अभिलाषा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Comment