महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मालिका , चित्रपट यांच्या शुटींगसाठी बंदी आहे . आणि याचमुळे मालिकेंच शुटींग थांबू नये म्हणून निर्मात्यांनी मालिकेंचे सेट महाराष्ट्राबाहेर उभारले आहे. यातच स्टार प्रवाह वाहिनी वरील मुलगी झाली हो या मालिकेच्या शुटींगला गुजरातमध्ये सुरवात झाली होती. आणि शुटींगच्या दरम्यान मुख्य भूमिका साकारणारे विलास पाटील म्हणजेच अभिनेते किरण माने यांना करोनाची लागण झाली. सध्या त्यांच्यावर गुजरात मध्येच उपचार चालू आहेत. स्वतः किरण माने यांनी ही बातमी सोशल मीडिया द्वारे दिली आहे.
“अनपेक्षितपणे मलाही गाठलं त्याने . गुजरातमधून माझ्या माणसांत आलोय . साताऱ्यात देवासारखी माणसं जोडली,ती मनापासून काळजी घेतायत. तुमचं प्रेम राहुद्यात सोबत .. चुटकीसरशी ‘निगेटिव्ह’ होऊन दाखवतो . एकाकीपणात तुमची साथ मोलाची असेल’’ अशी फेसबूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्ट वर चाहते त्यांची काळजी घेण्यास सांगत आहेत. रसिकांच्या मनोरंजनाला ब्रेक लागू नये म्हणून मालिकेचा सेट महाराष्ट्राबाहेर नेला पण अशातच मालिकेच्या मुख्य कलाकारालाच करोनाची लागण झाल्यामुळे काही दिवस ते काम करू शकणार नाही . आता मालिकेंच्या पुढील भागांचे शुटींग कसे होणार हा मोठा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे .
तर तुम्हाला मुलगी झाली हो ही मालिका कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.