स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील म्हणजेच अभिनेता किरण माने याची फेसबुक पोस्ट खुपच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील एका विशिष्ट गटावर निशाणा साधला आहे . या पोस्ट मधुन त्याने मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणाऱ्यांना त्याने सल्लाही दिला आहे. त्याने अस म्हंटल आहे की ‘या क्षेत्रात लाइफलॉंग करिअर करू इच्छिणाऱ्या वर्गातील कलाकारांनो .. कळकळीची विनंती आहे .. एकतर पुर्ण तयारीनिशी .. संपूर्ण ताकदींनं या किंवा येऊ नका,’
पाहुयात अभिनेता किरण मानेची पोस्ट
जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती…
उसकी बदनामी शुरू की जाती है !
…मराठी कलाप्रांताचा गळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय दोस्तांनो ! तुम्हाला माहितीय, किरण माने हवेतल्या गोष्टी बोलत नाही. तुकारामाची पताका हातात घेतलेल्या वारकर्याच्या रक्तात “अनुभवावाचून सोंग संपादणे” कदापी येणार नाही !
तुम्ही प्रतिभावान असाल-मेहनती असाल-आपलं काम खणखणीत वाजवत असाल… पण तुम्ही त्यांच्या ‘गटात’ न बसणारे – त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भयानक आणि जीवघेण्या संघर्षातून पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही !! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही ‘सुरक्षित’ आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच.
पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही कित्त्तीही जीव ओतून – प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत.
आपला तुकोबाराया या छळाबाबत बोलून गेलाय:
“रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… अंतर्बाह्य जग आणि मन !
जिवाहि आगोज पडती आघात… येऊनिया नित्य नित्य वारि !!
तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड !!!”
…’ते’ आधी तुम्हाला दुर्लक्षित करतात…
नंतर तुम्हाला ‘डावलणं’ सुरू होतं…
त्यानंतर तुम्हाला अपमानीत केलं जातं…
… तरीही तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून नाणं वाजवत राहीलात तर तुमची खोटी ‘बदनामी’ हा हुकमी एक्का काढला जातो…
त्यानंतरही तुम्ही जिद्दीनं, चिवटपणे, न थकता आपला झेंडा रोवत ‘अवघियांचे तोंड काळे’ करत राहिलात, तरच तुम्ही टिकू शकता !
या क्षेत्रात ‘लाईफलाॅंग करीयर’ करू इच्छिणार्या सर्वसामान्य ‘वर्गातील’ कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर ‘पूSSSर्ण’ तयारीनिशी… संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका.
– किरण माने.
तर किरण मानेच्या या पोस्टवर तुमच काय म्हणणं आहे हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा.