शुभमंगल ऑनलाइन मालिकेतील ऐश्वर्याचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

कलर्स मराठी वरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ ही मालिका प्रेक्षकांच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील एक पात्र म्हणजे ऐश्वर्या . ऐश्वर्या म्हणजे शंतनू आणि शर्वरीच्या लवस्टोरी मद्धे आलेला अडथळा . पण हे अडथळ्याचं पात्र देखील प्रेक्षकांना खुप आवडत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 ऐश्वर्या च खर नाव आहे समिधा गुरु. अभिनेत्री समिधा गुरूने सोनियाचा उंबरा या मालिकेतून टीव्ही मालिका क्षेत्रात पदार्पण केल. या मालिकेत तिने सुकन्या हे पात्र साकारले होते. अवघाची संसार ही मालिका तिच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. यात तिने इन्स्पेक्टर नेहाची भूमिका साकारली होती . त्यानंतर अनेक मालिकेंमद्धे ऐश्वर्या दिसून आली. ‘देवयानी’ या मालिकेत तिने खलनाईका गिरिजाची भूमिका साकारली होती. तसेच झुंज , कमला , तुझविण सख्या या मालिकेत देखील ऐश्वर्या दिसून आली. त्याचबरोबर सोनी मराठी वरील क्राइम पेट्रोल या मालिकेत देखील तिने काम केले आहे.

 समिधा म्हणते की मी आज अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर उभी आहे ती केवळ अभिजीत गुरु ह्याच्यामुळे . अभिनयाकडे हौस म्हणून नाही तर passion म्हणून carrier म्हणून बघितल पाहिजे हे मला अभिजीतने शिकवल आणि त्यासाठी प्रोत्साहन देखील दिलं .  अभिजीत गुरु म्हणजे समिधा गुरुचे पती. अभिजीतला आपण झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत KD च्या भुमिकेत पहिल आहे. तसेच त्याने अनेक मालिका , चित्रपट , नाटकांच लेखन केल आहे . हे दोघेही आपल्या आवडीच्या क्षेत्रात  काम करत आहेत. त्यांना दुर्वा नावाची एक मुलगीही आहे.

तर तुम्हांला समिधाचा अभिनय कसं वाटतो आणि अभिजीत समिधाची जोडी कशी वाटते ही कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .

Leave a Comment