टेलिव्हिजन वर विविध मराठी मालिकांमधून अनेक चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात ,त्यातील काही चेहऱ्यांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळते तर काही चेहरे काही काळाने अचानक गायब होतात.
तर जाणून घेऊया मराठी टेलिव्हिजनवर अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेल्या मात्र कालांतराने इंडस्ट्री पासुन दूर गेलेल्या कलाकारांविषयी
- संतोष जुवेकर
प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर याने अनेक मराठी चित्रपट , मालिका , नाटक यांमद्धे काम केली आहेत. या अभिनेत्याने या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून प्रसिद्धी मिळवली आणि घराघरात पोहोचला . तसेच तो colours मराठी वरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतून देखील त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षांपासून हा अभिनेता टेलिव्हिजन इंडस्ट्री पासुन दूर असुन सध्या तो आपल्या वैयक्तिक प्रकल्पांवर काम करत आहे.
- कादंबरी कदम
अवघाची संसार, तुजवीण सख्या रे या मालिकेतील लाडका चेहरा म्हणजे कादंबरी कदम . अनेक मालिका , नाटक आणि सिनेमात काम केल्यानंतर कादंबरीने देखील या माध्यमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला . सुप्रसिद्ध दिग्दर्शक अविनाशशी तिने लग्न केल असुन तीला कार्तिक नावाचा मुलगा आहे. कार्तिक सोबतचे अनेक फोटो टि सोशल मीडिया वर शेअर करत असते .
- नेहा गद्रे
अभिनेत्री नेहा गद्रे. स्टार प्रवाह वरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या नेहा गद्रेने देखील इंडस्ट्री मधून फारकत घेतली . ‘अजूनही चांदरात आहे’ ही मालिका असो किंवा मोकळा श्वास सारखा सिनेमातील तिच्या अभिनयाच कौतुक झाल. मात्र त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेत २०१९ मद्धे तिने ईशान बापट सोबत लग्न केले आणि ऑस्ट्रेलिया मध्ये शिफ्ट झाली.
- रेश्मा नाईक
झी मराठी वरील श्रीयुत गंगाधर टिपरे ही प्रेक्षकांची लाडकी मालिका होती .यातील सर्वच पात्र प्रेक्षकांची लाडकी ठरली . या मालिकेतील शलाका म्हणजेच अभिनेत्री रेश्मा नाईक देखील इंडस्ट्री पासुन दूर राहणं पसंत केलय . तिने लग्न केल असुन टी तिच्या संसारात busy आहे.
- नीलम शिर्के
वादळवाट , असंभव , चार चौघी , राजा शिवछत्रपती , हसा चकट फू , या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नीलम शिर्के गेली अनेक वर्षे ही इंडस्ट्री पासुन दूर आहे. निलमच लग्न झाल असुन तीला एक मुलगी आहे. ती सध्या रत्नागिरी शहरात राहते.
- यतीन कारेकर
मुन्नाभाई एमबीबीएस या बॉलीवुड चित्रपटमद्धे अर्धांगवायू झालेल्या आनंद भाईची भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते यतीन कारेकर यांनी राजा शिवछत्रपत्री या कार्यक्रमात मराठी दुरदर्शनमद्धे प्रवेश केला. या मालिकेत अभिनेत्याने औरंगजेबची भूमिका साकारली . नंतर हा अभिनेता देखील इंडस्ट्री मधून दूर गेला. आणि ही लवकरच आपल्याला डिजिटल क्षेत्रात दिसणार आहे.
- दीपाली सय्यद
अभिनेत्री दीपाली सय्यद आपल्याला अनेक मराठी चित्रपटांमद्धे दिसली. आणि नंतर ही अभिनेत्री देखील अभिनय क्षेत्रातून अचानक गायब झाली. नंतर ही अभिनेत्री आपल्याला दिसली ती तिच्या जवळची मैत्रीण अभिनेत्री मानसी नाईक हिच्या लग्नात. आणि गेल्या काही वर्षांपासून दीपाली राजकारणात दिसून येतेय .
तर या कालांकरापैकी तुम्ही कोणत्या कलाकाराला जास्त मिस करताय ही कॉमेंट्स करून नक्की सांगा