झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला गुरुनाथ म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर आता आपल्याला सोनी मराठी वरील एका नव्या मालिकेमद्धे दिसणार आहे. यात अभिजीत आपल्याला नायक आणि खलनायक या भूमिकेत दिसणार नसून तो यात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. हिंदी मधील क्राइम पेट्रोल ही मालिका खुप गाजली आणि अशीच मालिका आता सोनी मराठी घेऊन येत आहे. या मालिकेच नाव आहे ‘क्रिमिनल्स .. चाहूल गुन्हेगारांची’.
अभिजीत हा अभिनय क्षेत्रात येण्याआधी RJ होता. त्यानंतर त्याने खुप सारे अवॉर्ड शो , काही रिअलिटी शो देखील होस्ट केले आहेत. झी मराठी वरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मलिकेमुळे अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण वेगळं केलं होतं आणि याच मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर देखील पदार्पण केले आहे. नंतर तो माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील गुरुनाथची भूमिका साकारली होती. नुकतेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
तर तुम्ही गुरुनाथला म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरला या नव्या भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.