रात्रीस खेल चाले मालिकेतील कावेरी बद्दल बरंच काही

झी मराठी वाहिनी वरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत काही नविन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. या नविन व्यक्तिरेखेतलं एक नाव म्हणजे अभिरामची बायको. रात्रीस खेळ चाले या दोन्ही पर्वतील अभिरामची पत्नी देविका सर्वांनाच ठाऊक होती. पण आता या सीजनमद्धे अभिरामची पत्नी कावेरी दाखवण्यात आली आहे. कावेरी नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय . तर आज आपण जाणून घेणार आहोत कावेरी म्हणजेच अभिनेत्री भाग्या नायर बद्दल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत कावेरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे भाग्या नायर . अगदी कमी कालावधीतच हिचा अभिनय प्रेक्षकांना आवडू लागलाय. भाग्याने यूट्यूबवरील ‘itsuch’ या चॅनलच्या वेबसीरिज मद्धे काम केले आहे. तसेच ती इनस्टाग्रामवर रील्स व्हिडिओ देखील बनवत असते.

तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका मद्धे भाग घेतलेला आहे. तिने हिंदी शॉर्ट फिल्म ‘क्षणिक’ या मद्धे देखील काम केल आहे. ती अभिनेत्री सोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. तिने भरतनाट्यमच प्रशिक्षण घेतल आहे. तसेच तिने ब्रॅंडसाठी मॉडेलिंगही केले आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’ मद्धे ती मल्याळम भाषेत बोलताना दिसत आहे. भाग्या म्हणते की माझी मराठी चांगली नाही परंतु मी वेबसिरीजसाठी थोडी फार मराठी शिकले आहे.

तर तुम्हांला भाग्याची भूमिका आवडते का हे कॉमेंट्स करून नक्की सांगा.

   

Leave a Comment