अभिनेत्री वीणा जगतापने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून घेतली एक्जिट

सोनी मराठी वाहिनी वरील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सुरवातीला या मालिकेतील मुख्य भुमिकेत असणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ही मालिका सोडली होती. त्यानंतर आपण आर्याच्या भुमिकेत पहिले ते अभिनेत्री वीणा जगताप हिला. वीणाने देखील आर्याची भूमिका अगदी उत्तमरित्या साकारली होती. प्रेक्षकांना देखील तिचा अभिनय खुप आवडत होता पण आता अभिनेत्री वीणा जगताप हिने देखील मालिका सोडल्याची बातमी कळत आहे. तिने तिच्या हेल्थ इशु म्हणजे आरोग्याच्या समस्या सांगत ही मालिका सोडली आहे. आरोग्याच्या समस्येमुळे तिला शूटिंग करणं अवघड जात असल्याचं समजत आहे. आता आर्याची भूमिका कोणती अभिनेत्री साकरणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता आपण आर्याच्या भुमिकेत पाहणार आहोत ते अभिनेत्री रश्मी अनपट हिला. रश्मी ने याआधी अनेक  मालिकेंमद्धे काम केलेल आहे. त्यात अग्निहोत्र २ , कुलस्वामिनी , फ्रेशर्स , असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेंचा समावेश होतो. आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे तिचं अगदी लोकप्रिय नाटक आहे.

 तर तुम्हांला रश्मी अनपटला आर्या च्या भुमिकेत पाहायला आवडेल का हे कॉमेंट्स करून नक्की कळवा

Leave a Comment