जाणून घेऊया मराठी कला विश्वातील भावंडांबद्दल

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाइफ बद्दल त्यांच्या फॅमिली बद्दल, जाणून घेणं चाहत्यांना खुप आवडतं . त्यांच्या बद्दलची प्रत्तेक गोष्ट जाणून  घेण्यात चाहत्यांना रस असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर आज आपण जाणून घेणार आहोत आहोतं सेलिब्रिटी भावंडांबद्दल

  • अभिनेत्री वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर

मराठी इंडस्ट्री मधील सीनियर बहीणींची जोडी म्हणजे अभिनेत्री वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर . या दोघींनीही सिने इंडस्ट्री मद्धे खुप नाव कमवल आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमद्धे दोघींनी काम केलेली आहे . अभिनेत्री सोबतच त्या दोघी उत्तम गायिका देखील आहे.

  • शशांक केतकर आणि दिक्शा केतकर

शशांक केतकर आणि दिक्शा केतकर ही दोघे सख्खे भाऊ बहीण आहे. शशांक केतकर हे नाव मराठी इंडस्ट्री मध्ये खुपच गाजलेल आहे. ‘होणार सुन मी ह्या घरची’, ‘सुखाच्या सरीने हे मनं बावरे’ या मालिकांमधून शशांक घराघरात पोहोचला . आणि आता त्याला आपण झीमराठी वरील ‘पाहिले नं मी तुला’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना पाहतच आहोत . शशांकची बहीण दिक्शा केतकरने नुकतच मराठी इंडस्ट्री मद्धे पदार्पण केलं आहे. ती आपल्याला सोनी मराठी वर ‘तु सौभाग्यवती हो’ या नव्या मालिकेत ५ एप्रिल पासुन दिसणार आहे.

  • पौर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य

पौर्णिमा आणि पल्लवी या दोघी बहिणी असुन त्यांच्या माहेरचं नाव भावे आहे. पौर्णिमा यांनी ‘होणार सुन मी ह्या घरची , फुलपाखरू’ या मालिकेत काम केलय तर पल्लवी यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत पुतळा बाईंची भूमिका साकारली होती ती खुपच गाजली .

  • खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे

टेलिव्हिजन वर हिट असलेली जोडी म्हणजे खुशबू आणि तितिक्षा ह्या दोघींच बालपण डोंबिवलीत गेलय . या दोघींनीही होटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेतलय . तितिक्षा सरस्वती , तु अशी जवळी रहा मधून घराघरात पोहोचली तर खुशबू झी युवा वरील आम्ही दोघी या मालिकेतून झळकली . 

  • अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख

अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख हे सख्खे भाऊ बहीण आहेत . फ्रेशर्स , मी तुझीच रे या मालिकेंमधून आपल्या भेटीला आलेली ही अमृता तर झी मराठीवरील पसंत आहे मुलगी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिषेक भाऊ बहीण आहेत. हे दोघेही मुळचे पुण्याचे आहेत . अभिषेक सध्या स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत यश हे पात्र साकारत आहे.

  • भार्गवि चिरमुले आणि चैत्राली गुप्ते

वाहिणीसाहेब या मालिकेतून घराघरात पोहोचलेली भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या देखील बहिणी आहे भार्गवि या अभिनेत्री सोबतच एक उत्तम डान्सर देखील आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट देखील केले आहेत . चैत्राली यांनी स्टार प्लस वरील सास बहु और बेटिया या हिंदी मालिकेत काम केलं आहे.

  • अनुशा दांडेकर आणि शिबानी दांडेकर

अभिनेत्री अनुशा दांडेकरने लालबाग परळ , जय जय महाराष्ट्र माझा या मराठी चित्रपटांमद्धे काम केले असुन शिबानीला टाइमपास चित्रपटातील ‘ही पोरी साजूक तुपातली’ या आयटम सॉन्ग मुळे खुप प्रसिद्धी मिळाली

  • गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे

मराठी इंडस्ट्री मधील लोकप्रिय , सगळ्यांना आवडणारी अशी ही बहीणींची जोडी. त्यांची केमिस्ट्रि आपल्याला माहीतच आहे. अभिनेत्री मृण्मयी ने अग्निहोत्र मालिकेतून या इंडस्ट्री मद्धे पदार्पण केल नंतर तिने बऱ्याच मालिका आणि चित्रपट देखील केले. तर गौतमी ने सोनी मराठी वरील मी तुझीच रे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात एंट्री केली . आणि आता तीला आपण ‘माझा होशील ना’ या झी मराठीवरील मालिकेत पाहतच आहोत.

तर यामधील तुम्हाला आवडणारी जोडी कोणती हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.  

Leave a Comment