रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत लवकरच होणार शेवंताची एंट्री

२२ मार्च म्हणजे काल पासुन झी मराठी वाहिनी वर रात्रीस खेळ चाले भाग ३ सुरू झालेला आहे. प्रेक्षकांची आतुरता आता थांबली आहे. या मालिकेमधून अण्णा नाईक आपल्या भेटीला येणार असल्याच सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु अण्णा नाईक सोबत शेवंता देखील येणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडिया वर काही फोटो टाकून पुन्हा एकदा भेटूया. . . रात्री ११ वाजता . . सोम ते शनि फक्त आपल्या झी मराठी वर *रात्रीस खेळ चाले ३* हे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या फोटोला here it is…. Uploding this image for all fans demand !!! Love u all . Bhetuyat lvkarachhh…..हे कॅप्शन दिले आहे . यावरून ही गोष्ट तर confirm होतेय की शेवंता पण अण्णा नाईक सोबत आपल्या भेटीला येणार आहे.

रात्रीस खेळ चाले भाग १ आणि भाग २ च्या अभुतपूर्व यशानंतर निर्मात्यांनी रात्रीस खेळ चाले भाग ३ प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याचा निर्णय घेतला. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाबद्दल प्रेक्षकांमद्धे खूप उत्सुकता होती. २२ मार्च म्हणजे काल या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असुन लवकरच या मालिकेत शेवंताची एंट्री होणार आहे.     

Leave a Comment