अभिनेत्री रिंकु राजगुरु झळकणार या नवीन मराठी चित्रपटात

‘सैराट’ ह्या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु आता ‘आठवा रंग प्रेमाचा’ घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या मराठी चित्रपटाच्या नावाची नुकतीचं घोषणा झाली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आदिनाथ पिक्चर्स , राकेश राऊत प्रॉडक्शन आणि टॉप अॅंगल प्रॉडक्शनने आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. एए फिल्म्स हा चित्रपट वितरत करणार आहे. समीर कर्णिक , राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत तर दिग्दर्शक खुशबू सिन्हा यांचे असुन हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेते मकरंद देशपांडे ,अभिनेत्री रिंकू राजगुरु यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. त्याचसोबत विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातुन अभिनय क्षेत्रात पदार्पण करतं आहे.

आजपर्यंत प्रेमावरून खुप मराठी चित्रपट आले आणि यापुढे देखील येत राहतील. ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना नविन कथा पाहायला मिळणार आहे.  तर अभिनेत्री रिंकु राजगुरू हिचा नवीन चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment