‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ह्या मालिकेतील स्वीटूची आई ,नलू बद्दल बरचं काही . . .

 सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यातील स्वीटू आणि ओम सोबतच सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत . सर्वच कलाकार उत्तमरित्या आपापल्या भूमिका निभवत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण आज आपण जाणून घेणार आहोत स्वीटू ची आई नलू, म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर बद्दल .

अभिनेत्री दीप्ती केतकर हिचा जन्म १६ एप्रिल १९८१ रोजी मुंबई येथे झाला . दीप्ती केतकर ही अभिनेत्री तसेच उत्तम डान्सर देखील आहे. तिचं शालेय शिक्षण हे  सेंट थॉमस ,गोरेगांव ह्या शाळेत झालं असुन तिचं महाविद्यालईन शिक्षण हे नालंदा नृत्य कला महाविद्यालयात झालेल आहे . तिने तिच्या अभिनय करियर ची सुरवात ही मालिकांपासून केली, त्यात मनुष्यदेवता ही तिची पहिलीचं मालिका . त्यानंतर तिने दामिनी , अवघाची संसार , कुंकू , मला सासु हवी , कमला , भागो मोहन प्यारे अशा अनेक मालिकेंमध्ये तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे .

मालिकेंसोबतच तिने मराठी चित्रपटांमध्येही कामं केलेली आहेत. त्यात भक्ति  हीच खरी शक्ति , रंगराव चौधरी , सनई चौघडे ,बळिराजचं राज्य येऊदे अशा मराठी चित्रपटांमद्धे ही तिने कामं केली आहेत . मालिका , चित्रपट याबरोबरच दीप्तीने काही रीयालिटि शो देखील केले आहेत त्यात अप्सरा आली आणि एक पेक्षा एक यांचा समावेश आहे .

दीप्ती केतकर हिच्या नवऱ्याचं नाव रोमित केतकर असं असुन त्यांना एक मायरा नावाची ९ वर्षांची मुलगी आहे .

तुम्हांला अभिनेत्री दीप्ती केतकर हिची येऊ कशी तशी मी नांदायला ह्यातील नलू ची भूमिका कशी वाटते हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे जरूर सांगा.

Leave a Comment