मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीकांत मोघे यांचे ६ मार्च रोजी निधन झाले . त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनेने म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे हिने त्यांच्या आठवणींना उजाळा देत इनस्टाग्राम पेज वर एक भावनिक पोस्ट शेअर केली .
ती अभिनेते श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर करत म्हणाली की , माझा बाबा!
इतकं प्रेम , माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. “सासरे ” फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. “माझं पीयूडं” ,” माझं लाडकं” अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की “आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे ” असे सगळे प्रश्न विचारायचा. पुढे ती म्हणाली ,
बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायच.
गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्सहच कायम पहिला. “मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे” हे धोरण मानून कश्यातच तो फार अडकला नाही.
हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील. असे प्रियाने सांगितले .