‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा सीजन २ येणारं का?

झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ह्या मालिकेने ७ मार्च रोजी म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आपण पाहिलं शेवटच्या भागात गुरुनाथ सुभेदार च्या आयुष्यातील तीन बायका  म्हणजेच राधिका, शनाया आणि माया एकत्र येऊन गुरुनाथला चांगलाच धडा शिकवला तसेच त्याचा खोटेपणा सर्वांसमोर आणला .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गुरुनाथने असा विचार केला की ह्या बायकांनी मिळून माझं आयुष्य इथेच संपवल आहे आणि तो बायकांनपासुन लांबच रहायचं असं ठरवतो . तितक्यात एक मुलगी cab मधून उतरून गुरुनाथ ला पत्ता विचारू लागते आणि गुरुनाथ तिच्या बोलण्यात हारवून जातो, आणि तीला पत्ता दाखवायला तिच्या सोबत निघून जातो . cab मधून उतरलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री श्रुती मराठे हिने .  हयात आपल्याला श्रुतीचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला .

 गुरुनाथने ठरवून पण तो बायकांपासुन लांब राहू शकत नाही त्याच्या आयुष्यात नेहमीच एका नंतर एक बायका येतच गेल्या , आणि आता शेवटचा निर्णय घेऊन पण तो त्या  मुलीसोबत गेला याचाच अर्थ आपल्याला पुढची स्टोरी पाहायला मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही . कारण गुरुनाथच्या सुधरण्याने मालिकेचा शेवट होईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती परंतु तसं न होता गुरुनाथ पुन्हा त्याच मार्गावर जाताना आपण शेवटच्या भागात पाहिलं आहे. त्यामुळे मालिकेचा सीजन २ येण्याची शक्यता नाकारता येत नाही .  

  तर यावरून तुम्हांला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ह्या मालिकेचा सीजन २ येईल असं वाटतं का ? आणि आलाचं तर तुम्हांला पाहायला आवडेल का? हे आम्हांला कॉमेंट्स मध्ये सांगा .        

Leave a Comment