लागिरं झालं जी फेम शिवानी बावकरचे नवीन अल्बम सॉन्ग

झी मराठी वरील लागीरं झालं जी ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा सोशल मीडिया वर खूप चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तीचं आलेल नवीन अल्बम सॉन्ग ‘लग्नाची पिपाणी’. ह्या गाण्यात तिचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आत्तापर्यंत शिवानीची जे अल्बम सॉन्ग आले त्यात आपल्याला तीची आणि अभिनेता नितीश चव्हाणची जोडी पाहायला मिळाली परंतु ह्या गाण्यात आपण अभिनेता सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी पाहिली आहे. आणि ही जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

ह्या गाण्याचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं असुन, दिनकर खाडे यांचं गाणं मधुर मिलींद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे.  आणि हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

 तर तुम्हाला हे गाणं कसं वाटल हे आम्हांला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. 

  

Leave a Comment