स्वानंदी बेर्डे आणि प्रेम मोदी खरंच प्रेमात? प्रिया बेर्डे यांचा खुलासा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिची सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोमधील कॅप्शनमुळे स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु स्वानंदीची आई म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी या सगळ्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की , या सगळ्यामुळे आम्हाला खुप मनस्ताप झाला आहे. प्रेम मोदी हा स्वानंदीचा केवळ खूप चांगला मित्र आहे. प्रेम हा केवळ मित्र असल्यामुळे तिने त्याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली. पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्वानंदीने टाकलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करू शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की मला एकटीला भीती वाटत आहे. खुप प्रेम’ …. असं कॅप्शन तिने प्रेम मोदी सोबतच्या फोटोला दिले होते. नंतर तिने ही पोस्ट डिलीत देखील केली आहे.

आता स्वानंदी आई बाबांप्रमाणेच अभिनयाच्या विश्वात पदार्पण करत आहे. ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून ती ह्या विश्वात पाऊल ठेवणार आहे.

Tags: Swanandi Berde boyfriend Prem Modi news

Leave a Comment